सध्या ताणतणाव, अन्न पदार्थांमधील भेसळ यामुळे कमी वयात केस सफेद होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी केसांना डाय लावण्याऐवजी काही घरगुती उपाय केल्यास केस लवकर पांढरे होणार नाहीत. अकाली केस पांढरे होण्याची समस्या टाळायची असल्यास कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात…
हे उपाय करा
1. बटाटाच्या साला मध्ये स्टार्च असते, केस काळे करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाण्यात बटाट्याची साले 10 मिनिटांपर्यंत उकळायचे. त्यानंतर ते पाणी थंड करून केसांना लावायचे.
2. तिळाच्या तेलात दूधीचा रस एकत्र करून त्याने केसांची मालिश करायची. त्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे.
3. आठवड्यात दोन वेळा कोऱ्या चहाने केस धुवायचे. अनेक वर्षांपासून हा उपाय अनेक घरांमध्ये केला जातो.
4. कांद्याच्या रसात लिंबू पिळायचा आणि मग तो रस केसांना लावायचा. आठवड्यात दोन वेळा असा प्रयोग करता येतो.
5. 2 ते 3 चमचे कॉफी पाण्यात उकळायची. मिश्रण घट्ट होऊ द्या. थंड झाल्यावर हे मिश्रण केसांना लावून 45 मिनिटे वाळवा. त्यानंतर केस धुवून काढा.
6. आवळा हा अत्यंत गुणकारी आहे. आवळा मेहंदी सोबत एकत्र करून केसांना कंडिशनिंग करा. किंवा आवळा बारीक कापून नारळाच्या तेलात गरम करा ते तेल थंड करून केसांना लावा. त्यामुळे केस काळे होण्यास मदत होते.
7. आठवड्यात एकदा कच्चं दूध केसांना लावून धुतल्याने केस लवकर सफेद होत नाही.
8. आलं किसून त्यात थोडे कच्चं दूध एकत्र करा. हे मिश्रण केसांना लावून अर्ध्या तासाने धुवून काढा.
* मात्र हे करतांना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.