अखिल भारतीय पोलीस सेवा संवर्ग पदोन्नतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला :आयपीएसचे मानांकन १७ ‘मपोसे’ अधिकाऱ्यांना मिळणार

मुंबई :  प्रशासकीय दिरंगाईमुळे अडीच वर्षांपासून रखडलेल्या अखिल भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)संवर्ग पदोन्नतीला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला. मपोसे १७ अधिकाऱ्यांच्या नावे ‘आयपीएस’साठी निश्चित केलीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) निवड समितीची दिल्लीतील बेठकीत अधिका-यांची नावे निश्चित करण्यात आली.

गृहसचिव सीताराम कुंटे, मुख्य सचिव संजयकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल हे  बैठकीला हजर होते. आयपीएस नॉमिनेशन झालेल्या १७ अधिकाऱ्याच्या निवडीबद्दलचे आदेश केंद्रीय गृहविभागाकडून सुमारे महिनाभरानंतर जारी केले जातील. आयपीएस सेवेत दरवर्षी २५ टक्के जागा स्थानिक राज्य सेवेतून भरल्या जातात. यूपीएससीकडून निवड करून केंद्र सरकारला कळविली जातात.

महाराष्ट्राच्या मपोसेच्या कोट्यातील २०१७ या वर्षातील ७, २०१८मधील ५ आणि केडर पडताळणीतून ५ अशा आयपीएसची एकूण १७ जागा रिक्त आहेत. त्यासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रस्ताव पाठविण्याचे काम रेंगाळले होते. अखेर सेवाज्येष्ठतेनुसार ५१ पात्र अधिकाऱ्याच्या प्रस्तावाची यादी  पाठविल्यानंतर २७ मार्चला मीटिंग घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने त्यावर पाणी पडले. अखेर गेल्या शुक्रवारी दिल्लीत निवड समितीची बैठक झाली. त्यामध्ये १७ अधिकाºयांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.