पनवेल (संजय कदम) : गुडविल पॅराडाईज बिल्डिंग, सेक्टर 8, खारघरच्या समोरील फुटपाथवर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह खारघर पोलिसांना सापडून आला आहे.
त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची उंची पाच फूट दोन इंच, चेहरा उभट आहे. त्याने अंगात राखाडी व निळ्या रंगाची आडव्या पट्ट्याची टी-शर्ट व सफेद रंगाची फुल पॅन्ट घातली आहे. त्याच्या कमरेला चॉकलेटी रंगाचा बेल्ट असून उजव्या हातात केसरी रंगाचा धागा आहे.
या मृत ईसमाबाबत अधिक माहिती असल्यास खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक दाभोळकर यांच्याशी संपर्क साधावा.