पुणे : देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून या उपोषणाला राळेगणसिद्धी येथून सुरुवात होणार आहे. पाठिंबा देणाऱ्यांनी आपापल्या ठिकाणांहून यात सहभाग व्हावं, असं आवाहनही हजारे यांनी केलं आहे.