अतुल भगत यांच्या माध्यमातून पाणी वाटप

uran12
उरण (विठ्ठल ममताबादे) : दत्त जयंती निमित्त दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते तथा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख अतुल भगत यांच्या माध्यमातून भाविक भक्तांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतुल भगत यांच्या कामठा येथील पक्ष कार्यालय समोर भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
भाविक भक्तांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. अतुल भगत हे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो. या उपक्रमाला सुद्धा जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.भाविक भक्तांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख अतुल भगत यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *