अदानी इलेक्ट्रिक कंपनीला महावितरण कर्मचार्‍यांचा विरोध

shirish-gharat
पनवेल (संजय कदम) : तळोजासह नवी मुंबई शहर परिसरात वीज वितरणासाठी अदानी इलेक्ट्रिक कंपनीने समानंतर परवानासाठी अर्ज सादर केलेला आहे. या परवाना अर्जाला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती ने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी,अधिकारी, अभियंता उपस्थित होते. तळोजा शहरासह नवी मुंबई क्षेत्रातील महावितरण कंपनीच्या अधिपत्या खालील महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अदानी इलेक्ट्रिक कंपनीने समानंतर परवानासाठी अर्ज सादर केलेला आहे.
परंतु अशा प्रकारचा पहिला प्रयोग सदर ठिकाणी होत असून, सदरबाब जर असा परवाना राज्यात दिला गेला तर, राज्याच्या वीज उद्योगावर त्याचे विपरीत परिणाम होतील. तसेच वीज ग्राहकांना देण्यात येणारा दर हा विशेष करून, शेतीपंप असेल, दरिद्र्य रेषेखालील ग्राहक असेल, सार्वजनिक ठिकाणी असलेले पथदिवे इत्यादींना वीज खरेदीदरापेक्षा कमी दराने वीज देण्यात येते.
त्यामुळे सदरचे ग्राहक महावितरण कंपनीकडून खाजगी भांडवलदार यांच्याकडे गेले तर उर्वरित वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो व अशा प्रकारे महावितरण खाजगी उद्योगाकडे गेल्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसू शकतो.
याबाबत महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सुद्धा आपल्या भावना राज्यशासनाकडे पोहोचवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *