पनवेल (संजय कदम) : अध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर महाराज यांना परदेशातून जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
देवकीनंदन ठाकूर महाराज यांचे खारघर येथील सेंट्रल पार्क येथे २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान सदर प्रकार घडला आहे.
परदेशातून आलेल्या या फोनवरून देवकीनंदन महाराज यांना शिवीगाळ करत मुस्लिम समुदायाविरुद्ध बोलण्यापासून परावृत्त केले आहे. यावेळी देवकीनंदन महाराज यांनी सांगितले की, त्यांना दुबईहून धमकीचा फोन आला होता, ज्यामध्ये त्यांना मुस्लिमांविरुद्ध न बोलण्यास सांगितले होते आणि जर त्यांनी “सल्ल्याचे पालन केले नाही तर त्यांना ठार मारले जाईल” असे या फोन वरून सांगण्यात आले आहे.
त्यानुसार खारघर पोलिसांनी देवकीनंदन महाराज यांच्या सुरक्षेत वाढ करून संबंधित धमकीच्या फोनसंदर्भात अधिक तपास सुरु केला आहे.