१९३२ पासून सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव म्हणजेच व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाल्याची माहिती दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट हि आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टिम 👍🙏♥️
७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची निवड करण्यात आल्यामुळे दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचे रवी जाधव यांनी अभिनंदन केले आहे. रवी जाधवने आपल्या ट्विटमध्ये तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टीम, असे म्हटले आहे. दरम्यान, इ.स. १९३७ साली व्हेनिस शहरात भरणाऱ्या या चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.