नवी मुंबई : अमंली पदार्थांची तस्करी रोखण्याचे पोलीसांपुढे आव्हान

नवी मुंबई (प्रदिप पाटील ) : कोरोनो संकटाचा मुकाबला करण्यासाठी पोलिस यंत्रणा ताकदीने कामाला लागलेली असल्याचा फायदा उठवत अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. न्हावा – शेवा बंदर परिसरात एक हजार कोटीचे हेरॉईन जप्त केले होते. तस्करीचे म्होरके नायजेरीन नागरिकांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढले असल्याने सर्वत्र चिंतेचा विषय बनला आहे.

नवी मुंबई परिसरात असलेल्या महाविद्यालयांमध्ये अनेक नायजेरियन विद्यार्थी आहेत. खारघर, तळोजा, घनसोली, पनवेल या भागात राहणाऱ्या नायजेरीयन लोकांची संख्या अलिकडच्या काळात वाढली आहे. गेल्या वर्षभरात अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या नायजेरीयन गँगमधील ३० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून परदेशातून ड्रग्सची तस्करी केली जाते. त्यानंतर रस्तेमार्गे गांजा, हिऱॉईन, अफू नवीमुंबईत आणला जातो. नायजेरियन नागरिक व विद्यार्थी विविध महाविद्यालयीन विद्यार्थींना हे कष्टमर बनविलेले आहेत. संपूर्ण देशात दलालाच्या माध्यमातून वितरीत केला जातो.

नवी मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. ट्रॅव्हल्स, पीक अप वॅन, खाजगी कारच्या माध्यमातून गांजा, ड्रग्सचा साठा मुंबई एक्सप्रेस मार्गाने आणला जातो. मुंबईनंतर नवी मुंबई हे शैक्षणिक हब आहे. येथील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. नव्या पिढीला व्यसानाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी उपक्रम राबवण्याची गरज पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊन काळात पोलिसांनी आपली संपूर्ण ताकद ठिकठिकाणी संचारबंदीसाठी लावली आहे. ड्रग्स माफीयांनी याच गोष्टीचा फायदा उचलून ड्रग्सची तस्करी वाढविली आहे. हे रॅकेट मोडून काढण्याचे मोठे आव्हान नवी मुंबई पोलिसांपुढे आहे.