पनवेल (संजय कदम) : अज्ञात चोरट्याने मोटरसायकलवरून येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना खारघर वसाहती मध्ये घडली आहे .
खारघर येथील शीतल वायभासे या आपल्या दुचाकीवर बसलेल्या असताना पाठीमागून मोटरसायकवरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करण्याचा प्रयत्न केला.
वायभासे यांनी मंगळसूत्र वाचवण्याचा प्रयत्न केला असता ते तुटले व पाठीमागील कडीची बाजू त्याच्या हातात आली व अर्धे मंगळसूत्र घेऊन चोरट्याने पलायन केले.