अलिबागच्या वृद्धाश्रमाला चेंबुरच्या पंचरत्न मित्रमंडळाकडून अन्न-धान्य आणि वस्तूंची मदत

मुंबई (शांत्ताराम गुडेकर) : सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगोपात्त आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.

सद्यस्थितीत जगामध्ये सध्या कोविड-१९ म्हणजेच करोना या माहामारीने थैमान घातले आहे. अशा परीस्थितीमध्येही पंचरत्न मित्र मंडळ आर सी एफ चेंबुर यांनी समाजसेवेचे शिवधनुष्य समर्थपणे उचलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दि १३/०९/२०२० रोजी श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम,परहुर, अलिबाग येथे अन्नधान्य (४५० किलो), टॉवेल, औषधे, सँनिटायझर, मास्क व गृह उपयोगी वस्तू वाटप केले.

कार्यक्रमला आर सी एफ कंपनीचे सुहास शेलार (महाव्ययस्थापक), पुरषोत्तम तडवळकर (मुख्यव्यवस्थापक), हे उपस्थित होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड व बहुसंख्य सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे देणगीदार, शुभचिंतक तसेच आर सी एफ प्रशासन यांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. वैभव घरत यांनी सुत्र संचालन केले, तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी केले. मँथ्यु डिसोजा, हनुमंत चव्हाण, पिंकू, रहीम शेख, रमेश पाटील, बाळा साबले पाटील, दयाशंकर मिश्रा, जालिंदर इंगोले, सनी संदीप पाटील व मंडळाचे इतर कार्यकर्ते यांनी हा कार्यक्र यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यापुढेही पंचरत्न मित्र मंडळ असेच समाजहिताचे कार्यक्रम राबणार असल्याचे मत मंडळ अध्यक्ष अशोक भोईर यांनी व्यक्त केले.