अलिबाग : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा मोहरम हा सण गेले शंभर वर्षापासून अलिबाग तालुक्यातील मेढेखार या गावात जल्लोषात साजरा होत असतो. पण या वर्षी कोरोनाचे प्रादुर्भाव वाढल्याने येथील पिरबाबांचा मोहरम हा सण रद्द करण्यात आला आहे
यावर्षी दि ३० ऑगस्ट रोजी होणारा मोहरम सण संपूर्ण जगात कोरोनाचे प्रादुर्भाव वाढल्याने रद्द करण्यात आला आहे असे मेढेखार गाव पंच कमिटी व ग्रामस्थ यांनी सांगितले . या सणात संपूर्ण रायगड जिल्ह्यातील भाविक पिरबाबांचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. तरी यावर्षी भाविकांनी घरूनच नमस्कार करावा असे आवाहन मेढेखार गाव पंच कमिटी व ग्रामस्थ यांनी केले आहे.