अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गजेंद्र कांबळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आपला कोरोना योद्धा धारातिर्थी पडल्याची माहिती रायगड जिल्हा पोलिसांनी दिली. कांबळे हे रसायनी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
हवालदार गजेंद्र कांबळे यांना कर्तव्य बजावत असताना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. यानंतर ते कोरोनावरील उपचार घेत होते. कोरानाच्या या अटीतटीच्या झुंजीत अखेर गजेंद्र कांबळे यांचे निधन झाले. रायगड पोलीस दलाने या कोरोना योध्याला श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांसोबत संवेदना कायम असतील, असे म्हटले आहे.