भाकरवड : अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत श्रीगाव हद्दीतील मेढेखार येथे जय हनुमान क्रिडा मंडळ यांच्या तर्फे रविवार दि 8 जानेवारी 2023 रोजी स्व .विठाबाई सावळाराम पाटील ,व स्व नथुराम सिताराम तुरे यांच्या स्मरणार्थ फिरते स्मृती चषक भव्य कबब्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे आयोजन जवळपास 35 वर्षे अवितर पणे स्व. आमदार मधुकर ठाकूर व स्व. दत्ताराम पाटील (बच्चू काका ) क्रीडांनगरीत होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून श्री कुलदीप कारेकर मुंबई व श्री प्रविण ठाकूर प्रदेश चिटणीस कांग्रेस आय यांच्या शुभ हस्ते झाले तर विशेष अतिथी म्हणून नवनिर्वाचित आमदार महेंद्र शेठ दळवी अलिबाग मुरुड, युवा नेते सुमित भोईर कल्याण, अँड प्रविण दादा ठाकूर, प्रमोद पाटील वायसेत, अँड उमेश दादा ठाकूर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, दिलिप भोईर( छोटम शेठ), सरपंच कुहिरे संतोष कोळी, कुर्डुस सरपंच अनंत पाटील, ताडवागले सरपंच नवीन शिर्के, उपसरपंच विकास निळकर , तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, चंद्रशेखर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
सामन्यासाठी प्रथम क्रमांकश्री गणेश स्पोर्ट्स कासु , द्वितीय ओंकार वेश्वि, तृतीय क्रमांक टी बी एम कारावी , व चतुर्थ क्रमांक नवजीवन पेझारी, या विजयी झालेल्या संघास रोख रक्कम व आकर्षक सुमुर्ती चषक देऊन गौरविण्यात आले तर गावातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सत्कार समारंभ उत्साहात करण्यात आला.
यावेळी विशेष सत्कार महाराष्ट्र भूषण अँड जिविता पाटील व रायगड भूषण जीवन पाटील भाकरवड यांचाही सत्कार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रकाश तुरे, दीलदार थळे, जनार्दन पाटील, नंदन पाटील, लक्ष्मण पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले.
मॅन ऑफ दि सिरीज प्रेषित बोरघर कासु, उत्कृष्ट पक्कड प्रेम कांबळे वैश्वि, उत्कृष्ट चढाई राहुल कारावी तर शिस्त बद्द संघ श्री संत तुकाराम देहेन म्हणून सर्वाना मानचिन्ह व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत असोसिएशनचे एकूण दहा पंचांनी सहभाग घेतला होता तर निरीक्षक म्हणून जनार्दन पाटील यांनी काम पाहिले संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन हरीचंद्र म्हात्रे, रुपेश डाकी यांनी केले तर या सामन्यासाठी मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील , उपाध्यक्ष सदानंद पाटील, खजिनदार प्रशांत पाटील तर जय हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य ,पदाधिकारी, महिला वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले ही स्पर्धा कोणतेही गालबोट न लागता संपन्न झाली .