अलिबाग : अलिबाग-वडखळ रस्त्याची दुरवस्था ही दैनिय झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणा ऱ्यांचे अतोनात हाल होतांना दिसत आहे. मात्र प्रशासन, सरकार आणि लाेकप्रतिनिधी यांना त्याबाबत काहीच पडलेले नसल्याचे दिसून येते. येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाेग यांनी २६ जानेवारी राेजी आंदाेलन केले हाेते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा रस्ता जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यास मंजुरी दिली आहे.
अलिबाग-वडखळ हा रस्ता चांगला होणार, २१ मिनिटात अलिबागवरून वडखळला पोहोचता येणार, अशी विविध स्वप्ने या राजकारण्यांनी जनतेला दाखविली; पण तो रस्ता वाहतुकीसाठी निटनेटका करणेही कोणाला जमले नाही. परंतु अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांच्या आंदाेलनाला यश आले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून रस्ता करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे लेखी पत्रच नॅशनल हायवे ॲथोरिटीने दिलीप जोग यांना पाठविले आहे. जोग यांनी या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी २६ जानेवारीला जेएसडब्ल्यू कंपनीसमोरील चेकपोस्टवर जनआंदोलन केले होते.