अल्पवयीन मुलगी बलात्कारानंतर गरोदर; भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या पुतण्यास अटक

भाईंदर : सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर ती दोन महिन्यांची गरोदर राहिल्याने भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो आदी कायद्या खाली गुन्हा दाखल करून आरोपी यश शैलेश केळुस्कर ( १९) रा. सेव्हन स्क्वेअर शाळे जवळ, भाईंदर पूर्व याला अटक केली आहे. आरोपीच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा भाजपाचे माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत केळुस्कर यांचा सख्खा पुतण्या आहे. अल्पवयीन तरुणीवर आरोपीने जून महिन्यात मोटारीत बलात्कार केला होता. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली. घरच्यांना हे समजाताच त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक संपत पाटील आणि पोलीस पथकाने आरोपीला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.