नवी मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना सन 2020-21 साठी www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया सुरु झालेली असून केंद्र शासनाच्या सुचनेनुसार नवीन शिष्यवृत्तीसाठी व नतुनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत दि.31 ऑक्टोबर 2020 अशी निर्धारित करण्यात आलेली आहे.
तरी सदर योजनेबाबतच्या उपरोक्त संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचना व FAQs वाचून या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत. असे आवाहन विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण,कोंकण विभाग, पनवेल, जि.रायगड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे