नवी दिल्ली : वीज सतत महाग होत चालली आहे, ज्याचा थेट परिणाम लोकांच्या घरगुती बजेटवर होत आहे. परंतु, वीजेचे बिल कमी करणे जास्त अवघड नाही. यासाठी तुम्हाला आपल्या छप्परवर सोलर पॅनल लावावे लागतील. सोलर पॅनल कुठेही इन्स्टॉल करू शकता. अगदी छप्परावर सोलर पॅनल लावून तुम्ही विज बनवून ग्रिडमध्ये सप्लाय करू शकता. सोलर पॅनल लावणार्यांना केंद्र सरकारचे न्यू अँड रिन्यूअॅबल एनर्जी मंत्रालय रूफटॉप सोलर प्लँटवर 30 टक्के सबसिडी देते. सबसिडीशिवाय रूफटॉप सोलर पॅनल लावल्यास सुमारे 1 लाख रुपयांचा खर्च येतो.
या योजनेची पूर्ण प्रोसेस आणि होणारे लाभ जाणून घेवूयात…
यासाठी होणारा खर्च
एका सोलर पॅनलची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. प्रत्येक राज्यानुसार हा खर्च वेगवेगेळा आहे. परंतु सरकारकडून मिळणार्या सबसिडीनंतर एक किलोवॅटचा सोलर प्लँट कवेळ 60 ते 70 हजार रूपयात इन्स्टॉल होतो. काही राज्य यासाठी आणखी वेगळी सबसिडी देतात. सोलर पॉवर प्लँट लावण्यासाठी जर एकरकमी 60 हजार रुपये नसतील तर, तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्जसुद्धा घेऊ शकता. अर्थ मंत्रालयाने सर्व बँकाना होम लोन देण्यास सांगितले आहे.
हे आहेत लाभ
सोलर पॅनलचे आयुष्य 25 वर्षांचे असते. हे पॅनल तुम्ही छप्परवर सहज लावू शकता. आणि पॅनलमधून मिळणारी वीज निशुल्क असेल. सोबतच वाचलेली विज ग्रिडद्वारे सरकार किंवा कंपनीला विकू शकता. म्हणजे मोफत वीजेशिवाय कमाई सुद्धा होईल. जर छप्परावर तुम्ही दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावला तर दोन दिवसांच्या 10 तासापर्यंत उन पडण्याच्या स्थितीत यातून सुमारे 10 युनिट विज तयार होईल. जर महिन्याचा हिशेब केला तर सुमारे 300 युनिट विज तयार होईल.
असे खरेदी करा सोलर पॅनल
* सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या रिन्यूअॅबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटीशी संपर्क साधा.
* ज्यासाठी राज्याच्या प्रमुख शहरात कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
* प्रत्येक शहरात प्रायव्हेट डिलरकडे सुद्धा सोलर पॅनल असतात.
* सबसिडीसाठी फॉर्मसुद्धा अथॉरिटी कार्यालयातून मिळेल.
* अथॉरिटीकडून लोन घेण्यासाठी संपर्क साधावा लागेल.
मेंटनन्सचा खर्च नाही
सोलर पॅनलमध्ये मेंटनन्सच्या खर्चाचे टेन्शन नाही. परंतु प्रत्येक 10 वर्षात एकदा याची बॅटरी बदलावी लागेल. याचा खर्च सुमारे 20 हजार रुपये असतो. या सोलर पॅनलला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सहज नेता येते.
मिळतील 500 वॅटपर्यंचे पॅनल
सरकारकडून पर्यावरण संरक्षणाचा विचार करून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गरजेनुसार, पाचशे वॅटपर्यंत क्षमता असलेले सोलर पॉवर पॅनल लावू शकता. याअंतर्गत पाचशे वॅटच्या अशा प्रत्येक पॅनलवर 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येईल. हे प्लँट एक किलोवॅटपासून पाच किलोवॅट क्षमतेपर्यंत लावता येतील.