अवैधवैध वाहतुकीवर कारवाई करा….अन्यथा आंदोलन – नवभारतीय शिववाहतूक सेनेचा इशारा

vahatuk
पनवेल (संजय कदम) : पनवेल कळंबोली येथे लग्झरी बसमधून मोटार सायकल व इतर वस्तूंची बेकायदेशीर वाहतूक करताना भाजपा ट्रान्सपोर्टसेल प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पकडून दिली. राज्यभरात अश्याप्रकारे अवैध वाहतूक सुरु असून यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे जर परिवहन कार्यालयाकडून आठ दिवसाच्या आत कडक कारवाई झाली नाही तर २८ डिसेंबर रोजी संघटनेचे प्रभारी आमदार आशिष शेलार, राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस निलेश निम्हण व त्यांचे साथीदारांनी महाराष्ट्र राज्य परिवहन सहकारी उपायुक्त अभय देशपांडे यांची भेट घेऊन राज्यभरात चालणाऱ्या अवैध वाहतूक कारवाईची मागणी केली होती. त्यावर अभय देशपांडे यांनी सकारात्मक दर्शवत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पनवेल कळंबोली येथे मोटार सायकल व इतर माल यांची बेकायदेशीर वाहतूक करताना राजवीर ट्रॅव्हल्स च्या बसला रंगेहाथ पकडण्यात आले.
मात्र परिवहन विभागाकडून कर्मचारी उपलब्ध नसल्याकारणाने बस वर कडक कारवाई न करता सोडून देण्यात आली. त्यानंतर पुन्हा खोपोली येथे ५० सीटर बस शाळेतील विद्यार्थी घेऊन उलटली त्याची देखील माहिती दिली. तरीसुद्धा परिवहन कार्यालयातून आम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही.
त्यामुळे परिवहन कार्यालयाचे व अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांचे काही साटेलोटे आहे का असा प्रश्न विचारात परिवहन कार्यालयाकडून आठ दिवसाच्या आत कडक कारवाई झाली नाही तर २८ डिसेंबर रोजी संघटनेचे प्रभारी आमदार आशिष शेलार, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत पनवेल परिवहन कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *