अव्वल कारकून सुसलादे यांची तेराव्यावर्षी बदली; पोलादपूर येथून खालापूर तहसिलला हजर

पोलादपूर (शैलेश पालकर) :  पोलादपूर तालुक्यातील महसूल विभागामध्ये तब्बल 12 वर्षे 10 महिने सेवाकाळ बजावून यंदा प्रदीर्घ कालावधीनंतर तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून अशोक सुसलादे यांची खालापूर येथील तहसिल कार्यालयामध्ये बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे तहसिल कार्यालयातील पोलादपूर तालुक्याबाबतच्या सर्वात अनुभवी व्यक्तीची उणीव निर्माण झाली आहे.

2008 साली पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये अशोक सुसलादे यांनी अव्वल कारकून पदावर हजर होऊन पोलादपूर तालुक्यातील महसूली प्रकरणे, गृह आणि अन्य खात्या सुसलादेआण्णा म्हणून आपुलकीने ओळखले जात होते. गेल्या काही वर्षांपासून सुसलादे यांनी बदलीसाठी सातत्याने केलेले प्रयत्न त्यांच्या अनुभवामुळे रहीत होत असताना काही काळ त्यांना रिक्त नायब तहसिलदार पदाचाही कार्यभार सांभाळावा लागला.

यंदा तब्बल 13 व्या वर्षी अशोक सुसलादे यांची खालापूर तालुक्यात बदली झाल्याचे निश्चित झाल्यानंतर महाडचे तत्कालीन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याहस्ते पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई आणि निवासी नायब तहसिलदार समीर देसाई यांच्याहस्ते त्यांना निरोप देण्यात आला.

सर्व कार्यभार सोपविण्याचे सोपस्कार पूर्ण करून सुसलादेआण्णा आज शुक्रवारी खालापूर येथे संसारकुटूंबासह रवाना झाले असून तेथे त्यांचे अनेक वर्षांपासून अडकलेले प्रमोशनही होईल, अशा शुभेच्छा पोलादपूरवासियांनी दिल्या आहेत.

पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये 12 वर्षे 10 महिने प्रदीर्घ कालावधी सेवा बजावून खालापूर तहसिल कार्यालयामध्ये बदली झालेले अव्वल कारकून अशोक सुसलादे यांना निरोप व शुभेच्छा देताना महाडचे तत्कालीन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई आणि निवासी नायब तहसिलदार समीर देसाई