अष्टविनाक ग्रुप JNPT आयोजित जेएनपीटी चषक 2023 चे शानदार उद्घाटन !

cricket-uran
उरण (विठ्ठल ममताबादे) : मल्टीपर्पज हॉल जवळ असलेल्या जेएनपीटी मैदानावर 6 जानेवारी ते 8 जानेवारी 2023 असे तीन दिवस चालणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्याचे उद्घाटनप्रसंगी उपस्थित जेएनपीटी ट्रस्टी रविंद्र पाटील, शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख प्रदीप ठाकूर, कामगार नेते तथा भाजपचे पदाधिकारी चंद्रकांत घरत, उद्योजक विकास नाईक ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पाटील, किरण घरत, कुमारी दक्षता आणि सोनाली बळीराम घरत यांची उपस्थित होती.
पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि पूजन तसेच दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. क्रिकेट मैदानावर यष्टी पूजन करून व श्रीफळ फोडून सामन्यांची सुरवात झाली.
आयोजक – करण पाटील, अखिल घरत,तुषार कडू, प्रज्वल पाटील, युगांत पाटील, संजीवन पोटसुरे,सौरभ भोईर, केतन घरत, निशांत घरत, श्रुतेन घरत,साईराज पाटील, रुचिक घरत,यश घरत,मयूर पाटील,सिधेश ठाकूर यांनी उत्तम असे नियोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *