असा’ असेल मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:र्रिक्षण कार्यक्रम, जाणून घ्या

अलिबाग : भारत निवडणूक आयोगाकडून दि. 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:र्रिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे.

त्याची माहिती सहायक मतदार नोंदणी अधिकारी, 192-अलिबाग विधानसभा मतदार संघ तथा अलिबाग तहसिलदार सचिन शेजाळ यांनी कळविली असून ती माहिती पुढीलप्रमाणे :

* गुरुवार दि. 27 ऑगस्ट 2020
दावे व हरकती निकाली काढणे

* सोमवार दि. 7 सप्टेंबर 2020
अंतिम प्रसिद्धीसाठी मतदारयाद्यांची विशेष तपासणी

* शुक्रवार दि.18 सप्टेंबर 2020
डाटाबेसचे अद्यावतीकरण, पुरवणी याद्यांची छपाई

* शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर 2020
अंतिम मतदारयादी प्रसिद्धी