आईवडिलांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा – अनिल महाराज

xy
उरण (विठ्ठल ममताबादे) : आई वडिल हे आपले दैवत आहेत. आई वडिलांनीच आपल्याला हे सुंदर जग दाखविले आहे. आईवडिलांच्या उपकारांची परतफेड कधीच करता येत नाही. आई वडिल आपल्या मुलाचे पालन पोषण करतात मुलाला तळ हातातील फोडाप्रमाणे जपतात. मुलांची सर्वांगीण काळजी घेतात.
आईवडिलांना कितीही दुख: असले तरी त्यांचे दुख मुलांना कळू देत नाहीत. आपली मूले सुखात राहिली पाहिजेत यासाठी त्यांचा दिवसरात्र प्रयत्न असतो त्यामूळे आईवडिल हे पृथ्वीवरील देवता आहेत. ईश्वर आहेत आणि अशा आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. अनिल महाराज (वशेणी) यांनी आपल्या किर्तनात सांगितले.
नवघर गावातील रहिवाशी, सामाजिक कार्यकर्ते कै. राजाराम गणपत भोईर यांच्या तृतीय स्मृती दिना निमित्त मु. नवघर येथे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी 10 ते 12 यावेळेत झालेल्या कीर्तनात आईवडिलांचे महत्व अनिल महाराजांनी विशद केले. आईवडिल जसे मूलांची सर्वांगीण काळजी घेतात तशी मुलामुलींनीही आपल्या जन्मदात्या आईवडिलांचीही सर्वागीण काळजी घ्यावी. असे झाल्यास वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. कै.राजाराम गणपत भोईर यांनी समाजात वावरत असताना अनेक समाजोपयोगी लोकहीत उपयोगी कामे केली.कार्यक्रम राबविले, लोकांच्या सुखदुखाच्या अडचणीला धावून गेले.
आज त्यांची मूले विजय भोईर, विकास भोईर हे वडिलांचा वारसा पुढे चालवित आहेत. यातच पित्रा पुत्रांचे प्रेम व संस्कृती दिसून येते. कै. राजाराम भोईर यांनी आपल्या जीवनकार्यातून प्रत्येकांनी समाजाच्या, जनतेच्या उपयोगी पडले पाहिजे असा संदेश दिला. त्यामुळे प्रत्येकांनी समाजासाठी, समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देउन, समाजासाठी उपयोगी पडून,समाजकार्य करून जीवन जगले पाहिजे. असे जीवन जगणे हीच खरी कै.राजाराम भोईर यांना श्रद्धांजली असेल असे अनिल महाराज यांनी कीर्तनात सांगितले.
कै.राजाराम गणपत भोईर हे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोईर व उदयोजक विकास भोईर यांचे वडील आहेत. कै.राजाराम भोईर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त विजय विकास सामाजिक संस्थेतर्फे किर्तन, भजन आदि विविध उपक्रमांचे आयोजन रविवार दि 18/12/2022 रोजी नवघर येथे करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक विकास भोईर, भोईर कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार, विजय विकास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते, आपतेष्ठ आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी कै. राजाराम भोईर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *