आई द्रोणागिरी मंडळाच्या शिबीरात 66 दात्यांनी केले रक्तदान

पेण (गणेश म्हात्रे ) : उरण तालुक्यातील आई द्रोणागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करंजा आणि समर्पण ब्लड बँक घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने करंजा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सालाबादप्रमाणे सहाव्या वर्षी मंडळाच्या वतीने साखरचौथीच्या बाप्पाची अडीच दिवसांसाठी स्थापना करण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे जीवन संकटात असताना ही रक्ताची अडचण दूर करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून, शिबिराचे उद्घाटन करजा ग्रामपंचायत सदस्या कल्पनाताई पाटील यांच्या हस्ते पार पडले. मंडळाचे अध्यक्ष राजेश गावंड आणि सर्व पदाधिकारी समर्पण ब्लड बँकेच्या पी.आर.ओ. दर्शना उपाध्याय आणि डॉ. पल्लवी जाधव उपस्थित होत्या.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना तीन लाख पंन्नास हजार रुपयेची आर्थिक मदत, द्रोणागिरी मातेच्या मंदिरावर विद्युत रोषणाई आणि रस्त्याचे नामकरण करण्यात योगदान देणाऱ्या आई द्रोणागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिर राबविण्यात आले. रक्तदाते आणि सामाजिक कार्यकर्ते यांना थर्मास भेट देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश गावंड, उपाध्यक्ष सागर डाऊर, कार्याध्यक्ष केदार गायकर, सचिव प्रणय थळी, खजिनदार रितेश करंजेकर, सहखजिनदार गणेश थळी, या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच सर्व सदस्यांनीही खूप मेहनत घेतली. सुनिल वर्तक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. समर्पण ब्लड बँकेच्या दर्शना उपाध्याय यांनी आयोजकांचे आणि रक्तदात्यांचेआई द्रोणागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित शिबीरात ६६ दात्यांनी रक्तदान केले.