आजचे राशीभविष्य – 9 ऑगस्ट 2020; मेष राशीच्या विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग

मेष –  लक्ष्मीची कृपादृश्टी राहील . विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल.

वृषभ – व्यापारात  सौदे लाभदायक ठरतील. उत्पनाची  साधनांत वाढ होईल. वडीलधारे आणि मित्र यांच्याकडून लाभ आणि सुखद क्षण लाभतील.

मिथुन – सौसारिक  व मानसिक सुख मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होईल. अधिकारी प्रोत्साहन देतील.

कर्क –  आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

सिंह – आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल. निषेधार्ह विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत याची काळजी घ्या.

कन्या – दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल.

तूळ – आज सामान्यतः तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल.

वृश्चिक –  तब्बेतीची काळजी राहील. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या.

धनु – आज जास्त संवेदनशीलते मुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल.

मकर – आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहा. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. .

कुंभ –  द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद होतील.

मीन – आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. धार्मिक- मंगल कार्याला हजेरी लावाल.

सुभाष गुरुजी