आज महाडमध्ये कोरोनाचे १३ नवे रुग्ण; दोघांची कोरोनावर मात,

महाड(रवि शिंदे) : आज महाड तालुक्यात कोरोनाचे १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर दोघांनी कोरोनावर मात केली आहे.

महाडमध्ये कोरोनाचे १३ नवे रुग्ण आढळून आले असुन, या मध्ये प्रभाकर काॅम्प्लेक्स महाड ३३ स्त्री, तांबट‌आळी ३९, १५ पुरुष व ६२, ३७ स्त्री, नातेखिंड महाड ४० पुरुष, एमजी रोड नविपेठ महाड २१, स्वामी स्विट शेजारी नविपेठ २८, ७०, पुरुष व ५५ स्त्री, एमजी रोड महाड ६० पुरुष, गोंडाळे ५७ पुरुष, जुनी पेठ महाड ०४ पुरुष यांचा समावेश आहे. तर दोन रुग्ण बरे झाले आहेत. महाड मध्ये ११५ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत, तर ८२८ रुग्ण बरे झाले आहेत. अजुन पर्यंत महाड तालुक्यात ९८८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.