आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं, चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, औषधांचा तुटवडा, कोल्ड स्टोरेज फुल्ल, मृतदेहाचा खच

corona
नवी दिल्ली : मागील दोन वर्षात कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले पाहावयास मिळाले, सर्वत्र भितीचं वातावरण होतं. त्यानंतर हळूहळू कोरोनाची लाट ओसरली. आता तर भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचं प्रमाण नाममात्र राहिलं होतं.
परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे.
आपत्तीजनक परिस्थिती
चीनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झालाय. आरोग्यव्यवस्था अपुरी पडत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताटकळत पडले आहेत. एकंदरीत आपत्तीजनक परिस्थिती आहे.
जग हाय-अलर्टवर
चीनमधील कोरोना रूग्णसंख्या पाहता जगभरात सतर्कता बाळगली जात आहे. खबरदारी घेतली जात आहे.
सिक्वेन्सिंगचे आदेश
चीनमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता भारतातही खबरदारी घेतली जातेय. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. जर एखादा रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *