कर्जत (गणेश पवार) : कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटना यांच्या साह्याने कर्जत येथील पेज नदीवर कर्जत रिव्हर राफ्टिंग चा थरार आजपासून सुरू झाला आहे. संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी श्रीफळ वाढवला आणि सर्व सदस्यांनी प्रथम रिव्हर राफ्टिंग केले.
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कर्जत ची भुरळ नेहमीच पर्यटकांना पडते. एक दोन दिवस प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवून ताजे तावाने होण्यासाठी अनेक पर्यटक कर्जत ला येत असतात. स्थानिक तरुणांनी पर्यटन व्यवसायात प्रगती केली आहे.तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम प्रतीचे जेवण मिळावे,सुट्टी चा मनमुराद आनंद घेता यावा या साठी सर्वच सुविधा आपल्या रिसॉर्ट वर उपलब्ध करून देण्याचा येथील तरुणाई सातत्याने प्रयत्न करीत आहे.येथे आलेल्या पर्यटकांची उत्तम सोय करून त्यांना फ्रेश करण्याचा प्रयत्न भूमिपुत्र करीत आहेत.
कर्जत तालो दोन ते अडीच हजार फार्महाऊस मालक पर्यटकांना कमी पैशात राहाण्याची सोय उपलब्ध करून देतात यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे फक्त शनिवार रविवार पर्यटन असतात इतर दिवशी सर्वच रिसाँर्ट झाली असतात यामुळे कामगाराचा पगार लाईट बिल मेटेनन्स आणि इतर खर्च भागवणे कठीण होत आहे रविवार ते शुक्रवार पर्यटक फिरकत नसल्याने रिव्हर राफ्टिंग साठी येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून आठवड्याचे किमान काही दिवस स्थानिकांना रोजगार मिळू शकेल
तालुक्यात अनेक पर्यटक यावेत आणि त्या माध्यमांतून किरकोळ व्यवसाय करणाऱ्या तरुणाच्या हाताला काम मिळावे याचा प्रयत्न सातत्याने करीत आहेत.
कर्जत रिव्हर राफ्टिंगच्या माध्यमांतून पेज नदीवर चालू झालेला 5 किलोमिटर अंतराचा नागमोडी वळणाने पाण्याचे तुषार अंगावर घेत चित्तवेधक थरार यापुढे अनेक पर्यटकांना आकर्षित करील आणि त्या माध्यमांतून भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.