पेण : कोरोना व्हायरसने सर्व सामान्य माणसाच्या जिवनात अनेक अमुलाग्र बदल झालेत .या परिस्थितीत आता आदिवासींनाही आपल्या क्षमता व कौशल्य वाढवावे लागत आहे. आरोग्य सेवेसाठी सरकारने ई-संजीवनी अॅप आणला परंतु आदिवासींना अद्यापही याचा लाभ घेता आलेला नाही. कारण कधी लाईट नाही, तर कधी मोबाईलला नेटवर्क नाही. या परिस्थितीत अंकुर ट्रस्टने अडचणीवर मात करुन दिवासींना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळवूण दिला आहे.
नुकत्याच संस्थेमार्फत महिला नेत्रुत्व प्रशिक्षण झुम वर घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली, एवढेच नाही तर लोकमंच संघटनेचा आदिवासी युवक कार्यकर्ता गणेश वाघमारे, या बाबत प्रशिक्षीत झाला आहे. गेल्या ६ महिन्यापासून आदिवासी मधे नेत्रुत्व करणारी युवक व महिलांना लोकमंच, मकाम या राष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क सोबत झुम द्वारे जोडण्यात आले आहे. या बाबत बोलताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील म्हणाल्या निसर्ग वादळानंतर कोलमडलेली विद्युत व्यवस्था अद्यापही दुर्गम भागात अपेक्षित तेवढी सुरळीत झालेली नाही. दुर्गम भागातील ग्रामीण गरीब नेहमीच नव्या तंत्रज्ञानापासुन वंचीत राहिलेला आहे.
सदर झुम वरील महिला नेत्रुत्व प्रशिक्षणात एकुन १४ कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये १० आदिवासी महीलाही होत्या. या कार्यक्रमास नियती पाटील यांचे तांत्रिक सहाय्य मिळाले, तर अंकुर ट्रस्टच्या सुर्वणा पाटील यांनी महिलांना सोप्या भाषेत समजावुन सांगितले.