आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेची रोड लाईट व्यवस्था करण्याची मागणी

jitendra2
जव्हार ( जितेंद्र मोरघा ) : वाडा नगरपंचायत हद्दीतील कुणबी समाज हॉल ते खंडेश्वरी नाका, ठाणगेपाडा ते खंडेश्वरी नाका, खंडेश्वरी नाका ते मशाल टॉवर आणि नगरपंचायतच्या १७ प्रभागात रोड लाईटची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाडा शहरातील मुख्य रस्ते तसेच १७ प्रभागात काही भागात रात्रीच्या वेळेस रस्त्यांवरुन नागरीकांना अंधारातच ये-जा करावे लागते, या अंधारात काही अनुचित प्रकार घडु नये त्यामुळे लवकरात – लवकर रोड लाईटची व्यवस्था करावी यासंर्भात आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेने मा. मुख्याधिकारी नगरपंचायत वाडा यांच्याकडे मागणी केली आहे.
 याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा , जिल्हा अध्यक्ष तथा अरुण खुलात , जिल्हा संघटक नितिन दळवी , तालुका अध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष आदेश पाटील , सचिव राजेंद्र गवळी , तालुका कमिटी सदस्य दयानंद हारळ , वसंत धोदडे ,वाडा शहर कमिटी सदस्य मंगेश शिंदे ,रविंद्र मोरे ,लहु बसवंत , तुलसिदास झिरवे हे उपस्थित होते.