ठाणे : आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य मॉडेल रेसीडेशियल स्कुलमध्ये प्रवेशासाठीची परिक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रदद करण्यात आली आहे. ही परिक्षा ऑनलाईन होणार होती. परंतू परिक्षा रदद झाल्यामुळे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर जि.ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे इ. तालुक्यांचा व नवी मुंबई मिरा भाईदर महानगरपालीकांमधील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5 वी, 6 वी.7 वी, 8 वी, 9 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत.
त्यांच्या मागील सत्रातील गुणांच्या आधारे विद्यार्थीची निवड होणार आहे. सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विदयार्थ्यांनी प्रवेश परिक्षेचे अर्ज भरलेले आहे त्यांनी आता पाचव्या वर्गातील प्रथम सत्राचे गुण भरण्याचे निर्देश शासनाकडून दिले आहे. हाच निष्कर्ष 7 वी, 8 वी, 9 वी रिक्त जागेवरील प्रवेशासाठीही लागू करण्यात आलेला आहे. मागील सत्रातील एकंदर 900 पैकी विदयार्थ्यांनी किती गुण मिळविले त्याआधारे निवड यादी जाहिर केली जाणार आहे. मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांच्या गुणाऐवजी श्रेणी भरलेली स्विकृत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. विदयार्थ्यांचाअर्ज भरतेवेळी आवेदनपत्रामध्ये दिलेला संपर्क मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. विदयार्थ्यांची जन्मतारीख आवश्यक आहे. विदयार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रिकेची प्रत आवश्यक आहे. (स्कॅन केलेली गुणपत्रिकेची प्रत png, jpeg, ipg, pdf हया स्वरुपात असावी.) शाळेतील एकापेक्षा जास्त विदयार्थ्यांचे आवेदनपत्र भरलेले असतील, तर प्रत्येक विदयार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरावी तसेच गुणपत्रक स्वतंत्र अपलोड करावे.
आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांनी विदयार्थ्यांचे गुण mtpss.org.in या लिंकवर भरावयाचे आहे. त्याकरीता मुख्याध्यापक यांनी संबंधीत विद्यार्थ्यांचे प्रथम सत्राचे गुण 900 पैकी गुण नोंदवायचे आहे. (मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कला, क्रिडा, व कार्यानुभव असे एकूण 9 विषय) वर्ग 1 ली ते 8 च्या विदयार्थ्यांना देण्यात येणा-या प्रगती पुस्तकामध्ये श्रेणी देण्यात येते. त्यामुळे सर्व संबधीत विदयार्थ्यांचे त्यांच्या शाळेकडून गुण प्राप्त करुन मुख्याध्यापकांनी लिंकमध्ये दि. 15 सप्टेंबर 2020 पर्यंत भरावयाचे आहेत.
काही तांत्रिक अडचणींमुळे विदयार्थ्यांचे फॉर्म लॉगीन होत नसल्यास प्रकल्प कार्यालय विदयार्थ्यांची मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेली गुणपत्रके (hard copy) जमा करावी.असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर श्रीम.आर एच किल्लेदार यांनी केले आहे.