आधी हक्क मतदानाचा मग आयुष्याची लग्नगाठ; मुंडावळ्या बांधूनच नवरदेव मतदान केंद्राच्या मंडपात

voting-gram
रत्नागिरी : आजच आपल्या आयुष्याची लग्नगाठ बांधली जाणार आहे पण मतदानालाही तितकच महत्त्व देत एक युवक आज गुहागर तालुक्यात पाहायला मिळाला लग्नाच्या मुंडावळ्या बांधूनच मतदान केंद्राच्या मंडपात पोहोचला लोकशाही प्रक्रियेत पवित्र असलेला मतदानाचा हक्क बजावत आहे. हा तरुण मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाला.
आधी लोकशाहीप्रक्रियेत मतदानाचा हक्क मग आयुष्यभरासाठी जोडीदाराबरोबर लग्नगाठ असा निश्चय करुन मतदान करत एक मतदार जनजागृतीचा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या युवकाने केला आहे. जिल्हयात गुहागर तालुक्यातील चिखली येथील अभिलाष गोयथळे याने हा आदर्श घालून दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील  222 ग्रामपंचायत पैकी  59  ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्या असून उर्वरित 163 ग्रामपंचायतीसाठी आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे.त्यामध्ये सरपंच पदासाठी 406 उमेदवार तर सदस्यपदासाठी 1206 उमेदवार रिंगणात आहेत.507 मतदान केंद्रावर 2 लाख 15 हजार 45 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.त्यामध्ये 1 लाख 12 हजार 425 महिला आणि 1 लाख 2 हजार 520 पुरूष मतदार आहेत  67 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत .आज होणाऱ्या निवडणूकित  रिंगणात 406 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
गुहागर तालुक्यातील चिखली येथील अभिलाष गोयथळे या युवकाचे आज लग्न आहे लग्नाची लगबग सुरू आहे. मात्र आपल्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. त्यासाठी मतदान करणेही तितकेच महत्वाचे आहे. लग्नासोहळ्याआधी मतदानाला प्राधान्य दिले, त्यामुळे अभिषेक गोयथळे अवघ्या जिल्हयात कौतुकाचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *