आमडोशी, वांगणी येथील महिलांनी उद्योगाचे साधन म्हणून घेतले LED बल्ब चे प्रशिक्षण

amdoshi
कोलाड : रोहा तालुक्यातील नागोठणे विभागातील महिला सक्षमीकरण व तसेच बचतगट स्तरावर अग्रेसर असलेले आदर्श ग्राम संघ आमडोशी, वांगणी येथील महिलांनी समूहाला उद्योग व्यवसाय म्हणून एक आगळा वेगळा उपक्रम राबवून चार दिवस एल ई डी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण संपन्न करत एक वेगळा उपक्रम व समूहाला उद्योग व्यवसायाचे साधन म्हणून आदर्श ठेवला आहे .
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्तचे औचित्य साधून 03 ते 07 जानेवारी 2023 या कालावधीत युवा पुरोगामी सामाजिक संस्था अलिबाग, या संस्थे मार्फत आमडोशी, वांगणी समूहातील महिलांना L. E. D बल्बचे प्रशिक्षण येथील वांगणी ग्राम पंचायत मधून 15 वा वित्तआयोग अंतर्गत सदरचा उपक्रम व प्रशिक्षण राबविण्यात आले असून समूहातील तब्बल 40हून अधिक महिलांनी एकत्रित येऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेत यशस्वीपणे पार पडला आहे.
श्री राम समर्थ कृपा महिला बचत गट व आदर्श आमडोशी ग्राम संघाची संकल्पना व समूहाची मागणी तसेच ग्राम पंचायतीच्या पुढाकारातून हे प्रशिक्षण देण्यात आले, या प्रशिक्षणाचा शुभारंभ वांगणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सुनीता जांबेकर, सदस्या रोशनी भोसले, सदस्य एकनाथ ठाकूर ,युवा पुरोगामी संस्था अलिबाग हेमंत घरत, प्रशिक्षक गीता पाटील, बँकसखी वर्षा जांबेकर,यांच्या शुभहस्ते संपन्न झाला प्रसंगी ग्राम संघातील वीस बचत गटातील प्रमुख महिला प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
आदर्श आमडोशी ग्राम संघातील महिलांना एल ई डी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण चार दिवस मोठ्या उत्साही वातावरणात व येथील महिलांनी आनंदानी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पार पडले तर सांगता समारोह प्रसंगी प्रशिक्षक प्रमुख अमित मोहिरे, गीता पाटील, टिळक खाडे सर, उपसरपंच सुनीता जांबेकर ,सदस्य एकनाथ ठाकूर, सोपान जांबेकर, डॉ श्यामभाऊ लोखंडे बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश कातकरी, सतीश सुटे,दिनेश कदम, समूहाच्या बँक सखी वर्षा जांबेकर आदीं उपस्थितांनी सदरच्या व्यवसायबाबत उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.
40 महिलांचा समूह या प्रशिक्षणास उत्तमरित्या यशस्वीपणे काम करेल की नाही याचे प्रात्यक्षिक करून दाखव आदर्श ग्राम संघ अध्यक्षा रसिका गोळे crp दीपाली गोळे, श्री राम समर्थ कृपा महिला समूहच्या अध्यक्षा – संपदा जांबेकर, स्नेह सखी महिला समूहच्या सदस्या – निधी जांबेकर,आदर्श ग्राम संघ खजिनदार – नियती यादव, साई महिलागटाच्या सचिव सुचिता जांबेकर,यांनी प्रशिक्षणाविषयी शेवटी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की अत्यन्त सोप्या आणि सरळ पद्धतीने बल्ब कसे बनवतात ही चार दिवस शिकण्यास मिळाले तसेच मागील तीन दिवस आम्ही जे बल्ब बनविले ते सर्व च्या सर्व बल्ब पेटले आहेत त्यात कॅप बसविणे आतमध्ये लाईटसाठी वायर जोडणे सोल्डिंग करणे असे उत्तम प्रकारचे प्रशिक्षण मिळाले असल्याने आम्ही सर्व महिला एकत्रितपणे बल्ब तयार करून व्यवसाय सुरू करू शकतो असे सांगितले तर उपस्थित मान्यवर व समूहाचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *