आर्थिक मदतीसाठी आजच करा ऑनलाईन अर्ज, माजी सैनिकांच्या मुलांसाठी योजना

ठाणे : माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा यांच्या (हवलदार पदापर्यंत) पाल्यांकरीता केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडून सन २०२०-२१ करीता RMDF/AFFDF मधून आर्थिक मदत मिळण्याची तरतूद आहे. सदर आर्थिक मदतीसाठी (www.ksb.gov.inऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर  यांनी केले आहे.

आर्थिक मदत निकष

चारितार्थ अर्थिक मदत वय वर्ष 65 व पुढील पेंशन नसलेले माजी सैनिक विधवा रु 48000/- रुपये  सन 2020-21 अंतिम मुदत 1 मार्च 2021 अशी आहे. शालेय शिक्षण आर्थिक मदत पहिल्या 2 पाल्यांस रु.12000/-प्रतिवर्ष प्रतिपाल्य-1 ली ते 9 वी व 11 वी च्या पाल्यांनी 30 स्प्टेंबर 2020 पर्यंत अर्ज करावे. 10  वी व 12 वी यांनी  30 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करावे. बी.ए/बीएसी/बी कॉम यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे.

मुलीच्या लग्नाची आर्थिक मदत दोन मुलींसाठी प्रत्येकी रु.50000/- रुपये विवाहाच्या तारखेनंतर 180 दिवसांच्या आत अर्ज करावे. अंत्यविधी आर्थिक मदत रु.5000/- मृत्यू दिनांकानंतर 01 वर्षाच्या आत अर्ज करावे. अनाथ मुलासाठी आर्थिक मदत रु.12000/- प्रतिवर्ष मुदत नाही. 100 टक्के मतिमंद/अपंग पाल्यासाठी आर्थिक मदत  रु.12000/- प्रतिवर्ष, मुदत नाही. वैद्यकीय आर्थिक मदत रु 30000/- ते 125000/- हॉस्पीटल मधून डिस्चार्ज तारखेपासून 180 दिवसाच्या आत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.