पनवेल (संजय कदम) : पनवेल महापालिका क्षेत्रात आशा सेविकांना पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावे तसेच तसेच त्यांना २०,००० पर्यंत मानधन देण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी केली आहे. यासंदर्भात रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन दिले.
या निवेदनात रवींद्र भगत यांनी म्हटले कि, कळंबोली सह पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आशा सेविकांनी पाच वर्षाच्या कालखंडामध्ये नागरिकांच्या आरोग्या बाबत चांगल्या प्रकारे काम केले असता मागील दोन वर्षापासून सातत्याने ज्या पद्धतीने काम करत होते त्याबाबत त्यांना योग्य ती वेतन वाढ भेटायला पाहिजे यासाठी महासभेत वारंवार हि मागणी केली.
कोरोना कालखंडामध्ये देखील आशा वर्कर सेविकांनी आपल्या जीवाची कोणतीही परवा न करता घरोघरी जाऊन पेशंटची तपासणी केली. यासंदर्भात महासभेत झालेल्या चर्चेत त्याच्या मानधन वाढीवर आपण सकारात्मक विचार करू असे सांगतिले होते.
परंतु आजतागायत त्यांना कोणत्याही स्वरुपाचे वेतनवाढ करण्यात आले नाही. तरी या आशा वर्कर सेविकांना पनवेल महानगरपालिका समाविष्ट करण्यात यावे. तसेच त्यांना २०,००० हजारापर्यंत मानधन देण्यात यावे, अशी मागणी रवींद्र भगत यांनी केली.