माणगांव (रविंद्र कुवेसकर) : वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र केंद्र तालुका माणगांव जिल्हा रायगड आश्रमशाळा उतेखोल, माणगांव येथे २६ डिसेंबर हा कल्याण आश्रमाच्या स्थापना दिनानिमीत्ताने तसेच यावर्षी आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत या अमृत महोत्सवांमध्ये माणगांव मधील कल्याण आश्रमाच्या विजया गोपाळ गांधी अनुदानित आश्रम शाळेत जनजाती क्रांतिकारक हुतात्मा “नाग्या महादू कातकरी” यांच्या पूर्णाकृती पुतळा व भारत मातेचे शिल्प, सरस्वती मंदिर व नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे उद्घाटन अनावरण सोहळा रामचंद्रजी खराडी – राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, विष्णुजी सुरूम – प्रांताध्यक्ष वनवासी कल्याण आश्रम कोकण, ठमाताई पवार – अध्यक्ष संकुल समिती आश्रम शाळा माणगांव, प्रकल्प अधिकारी ए.आ.वि. प्र. पेण श्रीमती शशिकला अहिरराव, तसेच माणगांव नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमास वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांत सचिव – महेश देशपांडे, अध्यक्ष शालेय समिती आश्रम शाळा माणगाव – महादेव जाधव तसेच अनेक दानशूर मान्यवर मंडळी व आश्रम शाळेचे साडेचारशे विद्यार्थी व अनेक माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना चहापान व भोजनाची सुनियोजीत सोय देखील करण्यात आली. शाळेच्या भव्य परिसरात क्रांतिकारी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा पुर्णाकृती पुतळा व भारत मातेचे भव्य शिल्प व सरस्वती मंदिर झाल्याने आश्रम शाळेचे ते आता खास आकर्षण ठरणार हे निश्चित.
या देखण्या कार्यक्रमास जिल्हातुन व बाहेरुन लोकांची व आश्रम शाळेच्या साडेचारशे विद्यार्थी, सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांची लक्षणिय उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना चहापान व भोजनाची सुनियोजीत सोय देखील करण्यात आली. शाळेच्या भव्य परिसरात पहिल्यांदाच क्रांतिकारी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा, भारत मातेचे भव्य शिल्प व सरस्वती मंदिर हे आश्रम शाळेचे खास आकर्षण ठरणार.