नागोठणे (महेंद्र माने) : रोहा तालुक्यातील पाटणसई येथील बौद्धवाडी ते आदिवासीवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन गुरुवार 29 डिसेंबर रोजी करण्यात आले.
भूमिपूजनानंतर नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी आ. रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून विधानसभा मतदार संघातील सर्वच दर्याखोर्यात चांगले रस्ते होत असून पाटणसई बौद्धवाडी ते आदिवासीवाडी पर्यंतचा रस्ता हा वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नाने आ. रविशेठ पाटील यांच्या फंडातून करण्यात येत आहे.
या रस्त्याचे भूमिपूजन भाजपा रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड व प्रशांत रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले असल्याचे सांगून सदरील रस्ता हा मजबूत व चांगल्या दर्जाचा होणार असल्याचे शेवटी सचिन मोदी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला युवासेना (बाळासाहेबांची शिवसेना) रोहा तालुका सचिव मंदार कोतवाल, युवा भाजपा कार्यकर्ते राकेश मिनमीने, चंद्रकांत रा राणे, प्रल्हाद राणे, प्रल्हाद दाभाडे,निलेश कोतवाल, सागर राऊत, किसन पवार, वामन राऊत,विजय गायकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.