इग्नू बीएड, बीएससी (नर्सिंग) आणि पीएच.डी. परीक्षा वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षा केंद्र

exam
पनवेल (संजय कदम) : इग्नू बीएड, बीएससी (नर्सिंग) आणि पीएच.डी.साठी प्रवेश परीक्षा येत्या रविवारी ८ जानेवारी २०२३ आयोजित कऱण्यात आली आहे.
यामध्ये बीएड साठी सकाळी १० ते दुपारी १२(२ तास), B.Sc (नर्सिंग) साठी दुपारी २ ते ४.३०(२ तास) व Ph.D साठी दुपारी २ ते ५ (३ तास) अशी असणार आहे. यासाठी उमेदवाराने इग्नू द्वारे जारी केलेले हॉल तिकीट आणि वैध ओळख पुरावा सोबत आणावा. हि परीक्षा डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई कॅम्पस, प्लॉट क्र. 10, सेक्टर 16, नवीन पनवेल 410206. येथे होणार असल्याची माहिती इग्नू मुंबईचे प्रादेशिक संचालक (आय/सी) डॉ. कृष्ण राव ई. यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *