पनवेल (संजय कदम) : इनरव्हेल क्लबच्या स्थापना दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीकडून रा.स्व.संघ जनकल्याण समिती डॉ. प्रभाकर पटवर्धन रुग्णालयातील १२ डायलेसिस रुग्णांना एक वेळेच्या डायलेसिससाठी आर्थिक मदत केली. या वेळी रुग्णालयाचे मुख्य संचालक व्यवस्थापक रोटरियन श्री.सुनील लघाटे यांनी रुग्णांना देत असलेल्या सुविधांची माहिती दिली.
इनरव्हेल क्लबच्या स्थापना दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या अध्यक्षा हेतल बालड, उपाध्यक्षा ध्वनी तन्ना, सेक्रेटरी गिरा चौहान, कोषाध्यक्षा वैशाली कटारिया व सदस्य मौसमी गोगुले यांनी डॉ. प्रभाकर पटवर्धन रुग्णालयातील रुग्णांना आर्थिक मदत करीत विचारपूस केली.
यावेळी रुग्णांनी रुग्णालय, कर्मचारी व व्यस्थापन देत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त करत आभार मानले. यावेळी क्लब सदस्यांनी रुग्णालयातील सर्व विभागांची माहीत करुन घेत रुग्णालय करत असलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केले.