माणगांव : इन्स्टिटयूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग लोणेरे कॉलेजने आजतागायत खूप सारे विद्यार्थी घडविले आहेत. येथे शिक्षण घेऊन कित्येक विद्यार्थी हे उद्योजक तसेच क्लास -वन, क्लास-2 पदावर कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे परदेशात आणि आपल्या भारतात सुद्धा विशेष चांगल्या पदावर काम करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
येथे शिक्षण देणारी दुसरी शाखा म्हणजे विद्युत पदविका विभाग (इलेक्ट्रिकल डिप्लोमा) याची स्थापना 1997 साली झाली आहे, आज मितीस या गोष्टीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, याचेच अवचित्त्य साधून शनिवार दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी रौप्य महोत्सव साजरा करण्यात करण्यात येणार आहे.
या प्रसंगी यशस्वी उद्योजकांचा विशेष सन्मान केला जाईल. इंजीनीयरींग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काय करावे यावर खास चर्चा होणार असून विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे व विभागप्रमुख डॉ. नितीत लिंगायत यांनी केले आहे.