माथेरान (मुकुंद रांजाणे) : शैक्षणिक दृष्ट्या ई रिक्षा हा एकमेव भाग बनला असून तीन ते चार किलोमीटरची लहान लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची पायपीट आजपासुन थांबली असून आज रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने ई रिक्षाच्या माध्यमातून तीन रुग्णांना लाभ घेता आला आहे. ई रिक्षा ही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाणार आहे.
त्यानंतर होणारे फायदे तोटे लक्षात घेऊन सर्वासाठी कायमस्वरूपी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्यातरी दस्तुरी नाक्यापासून रेल्वे स्टेशन पर्यंत ही सेवा सुरू आहे.
यामध्ये स्थानिकांसह, पर्यटकांना आपल्या सामानासह वाहतूक करता येणार आहे.पहिल्याच दिवशी आज शाळेच्या विद्यार्थ्यांना रिक्षात सोडण्यासाठी पालकांची गर्दी दिसत होती. दूरवर असणाऱ्या शाळेत जाण्यासाठी पायपीट थांबल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
सकाळच्या दरम्यान एका मुलीला सर्पदंश झाला त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती त्यावेळेस अत्यावश्यक सेवा म्हणून याच ई रिक्षाचा दवाखान्यापर्यंत वापर करण्यात आला. एकूण तीन रुग्णांना याचा लाभ घेता आला आहे.
——————————————————-
सेंट झेव्हीयर हायस्कुल इंदिरा नगर पासून 3 किलोमीटर लांब असल्या कारणाने लहान मुलांना दप्तराचे ओझे घेऊन शाळेत जाताना खुपच दमछाक होत होती.आम्हा पालकांना दप्तर घेऊन आपल्या मुलाना सकाळी शाळेत सोडायला जाताना खुपच भारी पडत असे पावसाळ्यात उन्हाळ्यात गरमीच्या दिवसात खुप त्रास होत होता, ई रिक्षा सुरु झाल्याने आणि ई रिक्षाचा दर ही कमी असल्याने खुप मनाचे ,शारीरिक, ओझे कमी झाले आहे. यासाठी प्रयत्न करणारे सुनील शिंदे , प्रशासक सुरेखा भणगे यांना मनापासून धन्यवाद.
—संगीता सुतार, पालक
———————————————————
मी जेष्ठ स्थानिक नागरीक वय (७५) आजारी असून आजच मुंबई वरून दवाखान्यातुन दस्तुरी नाक्यावर आलो आणि माझ्या स्वप्नातील हीच ती ई रिक्षा ज्यातून प्रवास करण्याची माझी प्रबळ इच्छा होती, ती केवळ सुनील शिंदे यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाली आहे. या सेवेचा लाभ मला आज घेता आला यामुळे मी खूपच समाधानी आहे.
—-अन्वर शेख, जेष्ठ नागरिक माथेरान
Related