उत्तम कार्य केल्याबद्दल यशवंत ठाकूर यांचा सन्मान

yashavanti
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील बोकडविरा गावातील सामाजिक कार्यकर्ते गणपती देवस्थानचे ट्रस्टी, रायगड भूषण सन्मानित, यशवंत हरिश्चंद्र ठाकूर यांची गेली दोन वर्षांपूर्वी उरण तालुका विधी सेवा समिती येथे विधी स्वयंसेवक म्हणून निवड झाली.
उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल उरण न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वाली व दूसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका पठाडे, उरण बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रेय नवाळे यांच्या उपस्थितीमध्ये यशवंत ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
उत्तम प्रकारे उरण तालुक्यातील लोक न्यायालयाच्या माध्यमांतून समंजसपणे वाद-विवाद मिटवण्याचा जाहिरातीद्वारे प्रचार-प्रसार 36 ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष जाऊन केल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांचे वतीने सन्मानित करण्यात आले. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शेतकरी कामगार पक्षातर्फेहि त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *