कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यात गेली कित्येक दिवस पशु वैद्यकीय अधिकारी वर्गासह कर्मचारी वर्गाची कमतरता भासत असल्याने पशूंना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांची जीवित हानी होत असल्याचे समोर आले आहे याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न पशु पालकांकडून व्यक्त केला जात आहे.
रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथील शेतकरी व पशुपालक समीर राजाराम धुपकर यांनी एक महिन्यांपूर्वी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गर्भधारण केलेली एक गाय ठराविक रक्कम देऊन विकत घेतली होती तिचा बिल्ला नंबर 103437/ 530282 तर 27 नोव्हेंबर रोजी पहाटे तिचे दुर्दैवी अंत झाल्याने जणू आपल्या कुटूंबातील एक सदस्य गेला याचे दुःख झाले आहे आपल्या गोठ्यात गर्भधारण असलेले गाय हिचे पालन पोषण वेळोवेळी करत असलेले धुपकर आपल्या गाईला काही आजार असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी 25 नोव्हेंबर रोजी संबधित असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात थेट धाव घेतली परंतु त्यांच्या संबधित असलेल्या सदरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कोणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यादिवशी देखील त्यांची मोठी हेळसांड झाली ते पुन्हा घरी परतले परंतू गाईच्या होत असलेल्या आजाराच्या वेदना काही केला सहन होत नाही त्यांनी पुन्हा डॉक्टर कुठे मिळेल याच्या शोध घेत राहिले काही केल्या मिळेना पुन्हा डॉक्टरांचा तपास कुठे मिळेल का या हेतूने घराबाहेर पडले व कोलाड नाक्यावर आल्याने त्यांना डॉ पाटील यांचा संपर्क नंबर सापडला त्यावर देखील संपर्क झाला नाही झाला तर ते उचलत नाही त्यामुळे धुपकर यांची अधिक चिंता वाढली होती.
दुर्दैवाने एकदा संपर्क झाला त्यांनी सदरच्या पशुवैद्यकीय डॉक्टर यांना रीतसर आपल्या गायीच्या आजाराची लक्षणे व माहिती दिली परंतु गायीच्या उपचारासाठी येणारे डॉक्टर हे काही आले नाहीत त्यांना विलंब झाला ते दुसऱ्या दिवशी सकाळी धुपकर यांच्या येथे पोहचले परंतु तोपर्यंत गाईने प्राण सोडले होते मोठे दुर्दैव म्हणावे लागेल त्यामुले धुपकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले की आता शासनाची प्रशाकीय यंत्राना ही कुचकामी ठरत असल्याने या गरीब अहोरात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याची गर्भधारण असलेली गाय मृत्यू झाली याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वत्र उपस्थित झाला आहे.
लम्पी रोगावर नियंत्रण केले हे कितपत सत्य असेल यावर ही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर अशा दुर्दवी घटना घडत आहेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.मागील काही दिवसांपूर्वी रोहा कोलाड मार्गावर धाटाव स्टॉप नजीक एका गायीला अज्ञान वाहनाने धडक दिली होती व ती खूप गंभीर जखमी झाली तत्कालीन देखील अनेकांच्या मोबाईल वरून शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांना संपर्क साधला मात्र पशु सेवेसाठी नेमलेले डॉक्टर यांचा कॉल लागतो मात्र उचलत नाही हे अनेकदा समोर आले परंतु येथील नागरिकांनी रोहा येथील प्राणी मित्र कुमार देशपांडे यांना संपर्क साधला ते ताबतोब त्याठिकाणी पोहचले आणि दुखापत झालेल्या गाईवर मोफत उपचार केले तर शेतकऱ्यांना व त्यांच्या पशूंना वेळेवर शासनाच्या विविध उपचारासाठी सुविधा मिळत नसल्याने अनेकांची बोंब सुरू झाली आहे.
———————————–
मी 22 ऑक्टोबर 2020 रोजी दोन वर्षापूर्वी साठ हजार रुपये किंमतीची गर्भधारण केलेली गाय विकत आणली परंतु 27 नोव्हेंबर तिची अचानकपणे तब्बेत बिघडली मी अनेक सदरील पशुवैद्यकीय अधिकारी यांचा मिळालेल्या संपर्क क्रमांक 8275938395 यावर अनेकदा कॉल केले परंतु कोणताच कॉल उचलले नाही तसेच ते तद्नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या गाईला तपासन्यासाठी आले गाईवर वेळेत उपचार न झाल्याने गाईचे दुर्दैवाने अंत झाले असून याबत रोहा चे गट विकास अधिकारी यांना रीतसर तक्रार केली आहे तर मला आर्थिक मोठा फटका बसल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे तरी याची नुकसानभरपाई मिळावी तसेच आशा या आडमुठेपणा व चुकरपणा करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी व गाईचे मालक समीर धुपकर यांनी केली आहे.