उरण (विठ्ठल ममताबादे ) : 01 डिसेंबर 2022 रोजी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण व एन. आय हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही एड्स विषयक उरण शहरात जनजागृती रॅली आयोजित करण्याचा आलें होते.
या रॅली चे उद्घाटन मुख्याध्यापक डी. बी.कोठवदे व ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी. एम. कालेल यांच्या हस्ते करण्यात आले.या रॅली मध्ये उपमुख्याध्यापक जी बी पाटील,एस एस पाटील,पर्यवेक्षक व्ही पी सागळे ,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज ठाकूर, एस एस जगताप, व्ही एल काठे, सारिका घरत आदी मान्यवर उपस्थित होते. या रॅली मध्ये एड्स बदल वेगळे घोषणा देण्यात आल्या. वचन पाळा एड्स टाळा. युवकांनी ठरवायचं आहे एड्सला हरवायचे आहे.
मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. एड्स झालेल्या वक्तिंचा स्वीकार करू. भेदभाव टाळा अशा घोषणा देण्यात आल्या. जागतीक एड्स दिनाचे महत्त्व व एच.आय.व्ही.एड्स या रोगाविषयी जनजागृती करत महादेव पवार समुपदेशक इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय यांनी या रोगविषयी असणारे समज गैरसमज एच आय व्हीं होण्याचे कारणे सांगितली. एड्स विषयी मुलांशी संवाद साधला.विवाहपूर्व एड्स चाचणी करणे किती महत्त्वाचे आहे या बद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. बी.कोठावदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षक एस एस पाटील यांनी मानले.