उरणमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचं धुमशान ! १७ सरपंचपदासाठी ५३ तर १५१ सदस्यांसाठी ३७१ उमेदवार रिंगणात

voting-gram
उरण (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी विविध राजकीय पक्षांचे ५३ तर १७ ग्रामपंचायतीच्या १५१ सदस्य पदासाठी ३७१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
 उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.त्यापैकी घारापुरी ग्राामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
उर्वरित १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी इच्छुकांचे एकूण १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.त्यापैकी ९८ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. यापैकी बुधवारी (७) शेवटच्या दिवसापर्यंत ४४ उमेदवारांनी निवडणुकीतुन माघार घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी विविध राजकीय पक्षांचे एकूण ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
 तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या एकूण १६४ सदस्यपदासाठी ५५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.त्यापैकी छानणी नंतर ५४७ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर बुधवारी त्यापैकी १६३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ३७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
घारापुरी ग्रामपंचायतीची सरपंच, सदस्यांची  निवडणूक याधीच बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर नवघर-४,पुनाडे-१,भेंडखळ-१ आणि घारापुरी-७ अशा एकूण १३ जागेवर सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
चिर्ले ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी सर्वाधिक ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ
जसखार ११ जागांसाठी ३१ तर नवीन शेवा ९ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बुधवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्यानंर ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये सरळ, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार हे नक्की झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *