उरण : कंगना राणावतविरोधात पोलीस लाईन बॉईज संघटनेने दाखल केली तक्रार

पेण (गणेश म्हात्रे ) :  ज्या महाराष्ट्राने अभिनेत्री म्हणून मान मिळवून दिला, ज्या मुंबई पोलिसांचे गुणगान देश गातो, अश्या महाराष्ट्र आणि मुंबईत सुरक्षित वाटत नाही, असे बेताल वक्तव्य करून मुंबई पोलिसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कंगना राणावतने पोलिसांचा आणि पोलिसांच्या परिवाराचाही अपमान केला आहे.

अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई व्हावी अशी मागणी व तक्रार करणारे पत्र मंगळवारी पोलीस लाईन बॉईज संघटना उरणच्या वतीने उरण पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे.

आम्ही देशाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या परिवारातीलमुळे असल्याने आमच्या कर्तव्यदक्ष पालकांच्या अर्थात पोलिसांच्या झालेल्या अपमानाचा आम्ही जाहीर निषेध करतो असेही या पत्रात म्हटले आहे.

तक्रार दाखल करताना संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्षा स्नेहा गोडे, सचिव हेमंत सूर्यराव, आणि धनेश मळगावकर, सुदर्शन पाटील, रविंद्र मोकल, स्वप्निल कुंभार, हितेश भोईर, मनिष पाटील, महेंद्र म्हात्रे, वैभव तिलोरे, महेश पाटील, हेमंत थवई, प्रथमेश पाटील, तेजस्वी मळगावकर, माधुरी पाटील, सोनाली सूर्यराव आदी सदस्य उपस्थित होते.