उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाची सरशी

uran-v
उरण (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला असून, शिवसेना ठाकरे गटाचे 8 सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर रानसई या आदिवासी बांधवांच्या ग्रामपंचायतीवर भाजपाने एक हाती सत्ता संपादित करुन तालुक्यातील एकूण 5 ग्रामपंचायतीवर भाजपा पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात यश मिळविले आहे. काँग्रस पक्षाचे 3 सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले असून शेकापला 2 सरपंच पदावर समाधान मानावे लागले आहे. सरपंच पदी निवडून आलेल्या सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या 18 डिसेंबर रोजी पार पडल्या, मात्र यामध्ये घारापुरी ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झाल्याने या जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील ग्रामपंचायतीवर या अगोदर शिवसेना ठाकरे गटानी आपला झेंडा फडकावला होता. त्यामुळे उर्वरित जसखार, भेंडखळ, नवघर,पागोटे,
करळ, पुनाडे,वशेणी,सारडे,पिरकोन, धुतूम, चिर्ले, बोकडविरा, पाणजे, डोंगरी, नवीनशेवा,रानसई आणि कळंबुसरे या 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या 18 डिसेंबर रोजी पार पडल्या त्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निकाल हा उरण येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी काल 20 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी जाहीर केला आहे.
यामध्ये रानसई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गटांमध्ये सरळ चुरशीची लढत झाली त्यामध्ये भाजपाच्या सरपंच पदाच्या उमेदवार राधा मधुकर पारधी यांना 492 मते मिळाली ( विजयी) असून ग्रामपंचायतीचे सहा सदस्य निवडून आणत भाजपाने एक हाती सत्ता संपादित केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी काळूराम पारधी यांना 329 मते मिळाली असल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
जसखार ग्रामपंचायतीच्या शिवसेना ठाकरे गट- भाजपा आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार काशिबाई हसुराम ठाकूर यांना 928 मते मिळाली ( विजयी) तर पक्ष विरहित युवा गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुळा ठाकूर यांना 884 मते मिळाली.नवीनशेवा ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सोनल निलेश घरत यांना 880 मते मिळाली (विजयी) तर भाजपा आघाडीच्या सरपंच पदाच्या पराजित उमेदवार चेतना घरत यांना 286 मते मिळाली आहेत.
पाणजे ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीच्या उमेदवार लखपती हसुराम पाटील यांना 429 मते मिळाली (विजयी) तर शेकाप सरपंच पदाचे पराजित उमेदवार रोहन महादेव भोईर यांना 400 मते मिळाली आहेत.पागोटे ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गट – शेकाप सरपंच पदाचे उमेदवार कुणाल पाटील यांना 695 मते मिळाली (विजयी) तर भाजपचे सरपंच पदाचे पराजित उमेदवार जितेंद्र पाटील यांना 373 मते मिळाली आहेत.
कळंबुसर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गट- शेकाप सरपंच पदाच्या उमेदवार उर्मिला निनाद नाईक यांना 938 मते मिळाली ( विजयी) तर भाजपा सरपंच पदाच्या पराजित उमेदवार सरिता रत्नदीप नाईक यांना 530 मते मिळाली आहेत.नवघर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सविता नितीन मढवी यांना 1025 मते मिळाली ( विजयी) तर भाजपाच्या सरपंच पदाच्या पराजित उमेदवार शालिनी गणेश वाजेकर यांना 972 मिळाली आहेत.
भेंडखळ ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजिता मिलिंद पाटील यांना 799 मते मिळाली (विजयी) तर काँग्रेस- शेकाप आघाडीच्या सरपंच पदाच्या पराजित उमेदवार योगिता योगेश ठाकूर यांना 701 मते मिळाली आहेत.करळ ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार अनिता अरविंद तांडेल यांना 355 मते मिळाली ( विजयी) तर दर्शना नितीन तांडेल यांना 344 मते घेऊन पराजित झाल्या आहेत. डोंगरी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या सरपंच पदाचे उमेदवार संकेत दिलीप घरत यांना 546 मते मिळाली (विजयी),तर शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच पदावर न पोहोचलेले उमेदवार निलेश नरेश घरत यांना 542 मते मिळून निसटता पराभव पत्करावा लागला आहे.
.सारडे ग्रामपंचायत मध्ये भाजपा सरपंच पदाचे उमेदवार रोशन पांडुरंग पाटील यांना 579 मते मिळाली (विजयी) तर शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकांत राजाराम पाटील यांना 344 मते मिळून अपयश आले आहे.पुनाडे ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार निलेश अनंत कातकरी यांना 458 मते मिळाली (विजयी) तर भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे पराभूत उमेदवार सत्यवान कातकरी 386 मते मिळाली आहेत.पिरकोन काँग्रेस- भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार कलावंती काशिनाथ पाटील यांना 1399 मते मिळाली (विजयी)तर शेकाप युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार संगिता प्रशांत म्हात्रे यांना 1294 मते मिळून पराभव झाला आहे.
धुतूम ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस- शिवसेना युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांना 940 मते मिळाली ( विजयी) तर शेकाप- भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सिमा कांती ठाकूर यांना 609 मते मिळून पराभवाची धूळ चारली आहे.
चिर्ले ग्रामपंचायतीमध्ये शेकाप सरपंच पदाचे उमेदवार सुधाकर उर्फ काका भाऊ पाटील यांना 1321 मते मिळाली (विजयी) तर काँग्रेस – भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार विनोद राम पाटील यांना 1071 मते घेऊन पराभव झाला आहे.बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये शेकाप सरपंच पदाच्या उमेदवार अर्पणा मनोज पाटील यांना 829 मते मिळाली ( विजयी) तर आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रोहन महादेव भोईर यांना 400 मतांवर समाधान मानावे लागले असून मोठा पराभव सहन करावा लागला आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.पाणजे ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दोघा उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याने लहान मुलीच्या हातून चिठ्ठी काढून उमेदवार विजयी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. तर मत मोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *