उरण पूर्व विभागाला नविन विद्यूत उपकेंद्र उभारण्यासाठी खा. सुनिल तटकरे यांना वैजनाथ ठाकूर यांचं साकडं

sunil-tatkare
उरण/चिरनेर (सुभाष कडू) : उरण तालुक्यातील पूर्व भागातील सातत्याने खंडीत होणार्‍या विज पुरवठ्यावर उपाय म्हणून  एक नवीन विद्युत उपकेंद्र उभारावे अशी मागणी  माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी माजी पालक मंत्री आदिती तटकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेवून केली आहे. या साठी ते गेले तिन वर्ष सातत्याने ते शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.
या उपकेंद्राकरीता दिघोडे येथील प्रस्तावित आरोग्य केंद्रा जवळील शासकीय जागा वैजनाथ ठाकूर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून  दिली होती आणि त्या जागेवर उपकेंद्र बांधावे असे सुचविले होते. अदिती तटकरे पालक मंत्री असताना त्यांनी याबाबत हि जागा महावितरणला हस्तांतरीत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र त्यावर अद्यापही कारवाई होत नसल्याबद्दल  हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे.
उरण तालुक्यातील पूर्वविभागाला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीचे सबस्टेशनपासून अंतर ४० ते ४५ किलोमिटर एवढे प्रचंड आहे आणि या वीज वाहिन्या खाडीतील चिखल, दलदल आणि झाडा झुडपातून येत आहेत.त्याच बरोबर त्या 48 वर्ष जून्या  असल्यामुळे रोज तारा तुटून किंवा शॉर्ट सर्किट होवून वीज प्रवाह खंडित होतो.  त्यावर उपाय म्हणज उरण पूर्व भागासाठी नवीन सबस्टेशन उभारले पाहिजे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे देखील मत आहे. त्यासाठी वैजनाथ ठाकूर हे सातत्याने प्रयत्न करत आहेत.
महावितरणने देखिल यासाठी दिघोडे येथिल सर्व्हे क्र. ११६ (६) क येथील जागा महावितरणला हस्तांतरीत करावी असा प्रस्ताव तहसिल कार्यालयाकडे दिलेला आहे.दरम्यान, उपकेंद्रांला लवकर जागा हस्तांतरीत करण्याची मागणी वैजनाथ ठाकूर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *