उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, उरण आगार, मुंबई विभाग (उरण बस डेपो) मध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ(RMBKS) युनियन चा नामफलक अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कामगार नेते संतोष भाई घरत (RMBKS महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) यांच्या हस्ते नामफलक अनावरण झाले.एन.बी. कुरणे (RMBKS राष्ट्रीय महासचिव),गणेश पाटील (RMBKS रायगड जिल्हा अध्यक्ष), प्रकाश शरणागत(भारतीय युवा मोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष), भारत गायकवाड, मनोहर गायकवाड, सुनील वाघमारे, सुनील कुरणे, राजाराम कांबळे, दौलत जवरे, अमोल काटे, गौतम सोनकांबळे, विलास गोळे, रोहिदास भंजरे आदी कामगार वर्ग उपस्थित होते