उरण (विठ्ठल ममताबादे) : काँग्रेस सेवा फांउडेशन रायगड, अलिबाग मुरुड काँग्रेस कमिटी, भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना, ओबीसी व अल्पसंख्याक कमिटी आणि युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 3 जानेवारी 2023 रोजी अँड उमेश मधुकर ठाकूर (अध्यक्ष कॉंग्रेस सेवा फाउंडेशन रायगड, भाई जगताप मित्र मंडळ) यांच्या वाढदिवसा निमित्त कामगार नेते भाई जगताप सामाजिक सांस्कृतिक क्रीडा,शैक्षणिक, पत्रकारीता तथा वैदयकीय क्षेत्रातील गुणीजन, सामाजिक संस्था,संघटना, मित्रमंडळ यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत सातिर्जे मैदान, माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर सभागृहासमोर सातिर्जे, अलिबाग, जिल्हा रायगड येथे सायंकाळी 5 ते रात्री 9 दरम्यान संपन्न झाला. यावेळी काँग्रेस सेवा फॉउंडेशनचे पदाधिकारी, अलिबाग मुरुड काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना, ओबीसी व अल्पसंख्याक कमीटी आणि युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. उमेश ठाकूर,प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
उरण मधील विविध संस्था, संघटना, मान्यवरांना यावेळी कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, सोनाली बूंदे (शैक्षणिक) संगीता ढेरे (सामाजिक ), अजय शिवकर (साहित्य), सुभाष कडू (पत्रकार), राकेश पाटील(सामाजिक ),डॉ झेलम चंद्रकांत झेंडे (शैक्षणिक )आदी मान्यवरांना यावेळी कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उरण मधील विविध संस्था, संघटना, पुरस्कार प्राप्त मान्यवरांवर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.